युनिव्हर्सल कनेक्ट : अभिनय
प्रेमगीतांकडे म्हणजे बोलांकडे लक्ष जाणाऱ्या वयात जेव्हा मुलगी पदार्पण करते तेव्हा, एरवी आजीशी मजा मस्ती करत गाणे ऐकणाऱ्या, गुणगुणणाऱ्या तिचे पाय आता त्याच्या अर्थांकडे वळण्यास सुरुवात करतात. झोप येण्यासाठी लागणारी गाणी आता अगदीच झोप उडवतात असे नाही पण त्यांच्या शब्दांच्या कोहऱ्यामागे काय लपलंय हे ती शोधत असते. इतक्यात कुठल्या त्या शोधाला मूर्त रूप येणार आहे ? तिला खोल भावनांशी पहिला कनेक्ट आईकडूनच मिळत असतो. कारण आईचे प्रेम धबधब्यासारखे तर बाबांचे समुद्रासारखे असते. समुद्रात स्वतः शिरकाव केल्याखेरीज पाणी अंगावर येत नाही. धबधबा मात्र अंतर राखून अभे राहिलात तरी शिंतोड्यांचा प्रसाद देतोच! ती dedicate करत राहते सगळी गाणी आईला ... ... एक दिवस तिच्या आजीला वेडीच आहेस असे खोडकर हसत म्हणणारे आजोबा तिला दिसतात. आजीचा सुरकुतलेला चेहरासुद्धा प्रसन्न हास्यात रंगून उजळलेला असतो. त्याक्षणी तिला प्रेम या शाश्वत अनुभवाचा काहीसा वेगळा कंगोरा जाणवतो. आजूबाजूच्या middle age crisis मध्ये फसलेल्या जोडप्यांच्या रॉक बँडच्या बॅकग्राऊंड स्कोअर पुढे तिला हा संवाद जास्तच magical वाटतो. ...