युनिव्हर्सल कनेक्ट : अभिनय


प्रेमगीतांकडे म्हणजे बोलांकडे लक्ष जाणाऱ्या वयात जेव्हा मुलगी पदार्पण करते तेव्हा, एरवी आजीशी मजा मस्ती करत गाणे ऐकणाऱ्या, गुणगुणणाऱ्या तिचे पाय आता त्याच्या अर्थांकडे वळण्यास सुरुवात करतात. झोप येण्यासाठी लागणारी गाणी आता अगदीच झोप उडवतात असे नाही पण त्यांच्या शब्दांच्या कोहऱ्यामागे काय लपलंय हे ती शोधत असते. इतक्यात कुठल्या त्या शोधाला मूर्त रूप येणार आहे ? तिला खोल भावनांशी पहिला कनेक्ट आईकडूनच मिळत असतो. कारण आईचे प्रेम धबधब्यासारखे तर बाबांचे समुद्रासारखे असते. समुद्रात स्वतः शिरकाव केल्याखेरीज पाणी अंगावर येत नाही. धबधबा मात्र अंतर राखून अभे राहिलात तरी शिंतोड्यांचा प्रसाद देतोच! ती dedicate करत राहते सगळी गाणी आईला ... 

... एक दिवस तिच्या आजीला वेडीच आहेस असे खोडकर हसत म्हणणारे आजोबा तिला दिसतात. आजीचा सुरकुतलेला चेहरासुद्धा प्रसन्न हास्यात रंगून उजळलेला असतो. त्याक्षणी तिला प्रेम या शाश्वत अनुभवाचा काहीसा वेगळा कंगोरा जाणवतो. आजूबाजूच्या middle age crisis मध्ये फसलेल्या जोडप्यांच्या रॉक बँडच्या बॅकग्राऊंड स्कोअर पुढे  तिला हा संवाद जास्तच magical वाटतो. 

या light, soft, magical अनुभवानंतर कालपरत्वे इतर अनेक mature अनुभव अनुभवून आयुष्याची डोंबिवली फास्ट झालेली असताना परत तोच magical bond बघता येईल? प्रश्नचिन्हच होतं माझ्या डोळ्यासमोर, पण इतक्यात बघितलेल्या 'खुजली' या शॉर्ट फिल्म ने हा प्रश्न मोडीतच काढला. 

तसं बघितलं तर विषय बोल्ड. पण नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ यांचा सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय आपल्याला फिल्म च्या शीर्षकाच्या शब्दशः अर्थापासून प्रत्येक माणसाच्या अंगात सुप्तावस्थेत असलेल्या अन अचानकच कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रकट होणाऱ्या खुजली या गर्भितार्थाकडे कधी पोहोचवतो काळात नाही. बोल्ड विषयाचं संयमित आणि नवीन पिढीमागे धावताना, जुन्या पिढीच्या संस्कारात बांधलेल्या, मधल्या पिढीचे वास्तवावर बोट ठेवणारे चित्रीकरण ..... बस दिल छू जाते हैं बॉस !!!

बोलून शब्दातून पूर्णपणे व्यक्त न होणाऱ्या कित्येक भावनिक खाचाखोचा हे दिग्गज त्यांच्या फक्त चेहऱ्यावरच्या  बदलणाऱ्या रेषांतून  किती चपखलपणे, सहज, अचूक आपल्यापर्यंत पोहोचवतात. अर्थात इथेही पार्श्वसंगीताचा हातभार आहेच. आपण प्रत्येक क्षण स्वतःच अनुभवतो आहोत असे वाटते. 

संगीताइतकाच सर्वांपर्यंत पोहोचणारा अभिनय हा युनिव्हर्सल कनेक्ट आहे.  दृक, श्राव्य अशा सगळ्या माध्यमांतून आपल्या  ज्ञानेंद्रियांना खिळवून ठेवून क्षणभर वेगळ्याच जगात नेण्याची जादू या कनेक्ट मध्ये आहे. फक्त तेवढ्या ताकदीचा कलाकार हवा. एकदा का प्रेक्षकाला त्याच्या किव्वा तिच्या चेहऱ्यात स्वतःचा चेहरा दिसू लागला कि मोहीम फत्ते! 

जरा हटके विषयावरची हि शॉर्ट फिल्म आपल्यासाठी ... 



पौर्णिमा ढेरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कनेक्ट

युनिव्हर्सल कनेक्ट : गीत