युनिव्हर्सल कनेक्ट : गीत
आजकाल संगीताचा आस्वाद ही खूपच वैयक्तिक बाब झाली आहे. मनाच्या कलानुसार गाणी हेडफोन द्वारेच ऐकली जातात किव्वा स्पीकर असेल तर तो कार मधला लॉन्ग ड्राईव्ह सोबतच! घरात पडलेल्या म्युझिक सिस्टिम्स , स्पीकर्स समारंभ किव्वा पार्टीपुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळे त्याच्यावर वाजणाऱ्या गाण्यांचा बाज वेगळा असतो. पूर्वी पूर्ण कुटुंबावर रेडिओचे संस्कार होते. घरातल्या दिवसभरच्या एकांकिका, नाटके, भारुडांना रेडिओचे पार्श्वसंगीत असायचे. त्यातूनच कदाचित अजरामर गाण्यांचा दबदबा निर्माण झाला आणि आजकालची गाणी अल्पायुषी झाली आहेत.
काही गाणी आता ऐकताना खूपदा असे वाटते कि, आपल्या वयामुळे किव्वा गाण्यांच्या चित्रीकरणातील, ध्वनिमुद्रणातील, संगीतातील दिगज्जांमुळे किव्वा हिंदी चित्रपटातील एकाच अक्षाभोवती गिरक्या घेणाऱ्या कथानकामुळे आपण काही गीतांवर आणि गीतकारांवर अन्याय केला आहे. आंधी चित्रपटातील 'इस मोड से जाते हैं, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें ' यापैकीच एक. यात नायक- नायिकेचे नाही, तर वेगवेगळ्या वाटांचे वर्णन आहे, याची आपण म्हणावी तितकी दखल घेत नाही. त्या वाटांचे वर्णन इतके अचूक आहे कि, त्या आपल्या डोळ्यासमोर जिवंत उभ्या राहतात. 'एक दूरसे आती हैं, पास आके पलटती हैं' ही संजीव कुमार यांच्यासाठी किशोर कुमार यांनी गायलेली ओळ आणि 'ये सोचके बैठी हूं, एक राह तो वो होगी, तुम तक जो पोहोचती हैं, इस मोड से जाती हैं' ही लताजींची ओळ सिनेमातील पात्रांचा प्रवास अधोरेखित करतातच पण आपल्याही जीवन प्रवासातील वेगवेगळ्या वळणांची आठवण करून देतात.
'ए री पवन' हे 'बेमिसाल' सिनेमातील लताजींचे गाणे असेच. या गाण्यामुळे तुमच्या मनात कोणती भावना निर्माण होते? एक अनामिक ओढ? हुरहूर? रितेपणा? कि ecstasy ? हे गाणे ज्या वयात ऐकू त्यानुसार भावना बदलतात हे मला जाणवले. ह्या गाण्यातील 'पवन ' हे रूपक आपल्याच 'स्व'च्या वेगवेगळ्या अस्तित्वाशी कनेक्ट करत जाते.
गाणी sad, happy, एका वेगळ्याच दुनियेत नेणारी असतात . काल मुलीशी बोलताना तिने अचानक विचारले राग किव्वा इतर भावना व्यक्त करणारी गाणी असतात का ? मला लगेच 'कैसा खुदा हैं तू ? बस नामका हैं तू, रब्बा जो तेरी इतनीसी भी ना चली' ह्या 'लव्ह आज कल' मधील गाण्याच्या ओळी आठवल्या. सोबतच एक bargain करणारा प्रियकर डोळ्यासमोर उभा राहिला. प्रियतमेची मनधरणी करणारा प्रियकर आपल्याला खूपश्या गाण्यांतून दिसतो. पण प्रियसीसाठी देवाला वेगळ्याच ढंगात साकडं घालणारा हा निराळा प्रियकर गीतकाराने निर्माण केला आहे.
गाण्याचे चित्रीकरण, सैफ अली खानचा अभिनय, जुन्या जमान्यातील तरल, नितळ भावना, अर्थात तो जमाना दर्शविणारे कला दिग्दर्शन, समाजबंधनातही उलगडणारे हळुवार प्रेम आणि त्याचे या संस्कृतीत न वाढलेल्या महिलेने तितक्याच ताकदीने निभावले सादरीकरण, अर्थात दिग्दर्शकाची कमाल असणारच. या सगळ्या मसाल्यात एका वेगळ्याच माहोल मध्ये आपल्याला नेऊन ठेवणारं हे गाणं. त्याच्या बोलांमुळे मला हे गाणे ऐकून नेहमीच खूप हसू येते.
तर आपल्या या नायकाला आजच्या पिढीतील मोकळेपणा मिळाला नसल्याने कुठला मार्गच नसतो. तो बोलणार कोणाला? गाऱ्हाणे सांगणार कसे ? म्हणून हा बहाद्दर प्रेमामुळे त्याच्या जीवनात निर्माण झालेली सकारात्मकता दिवसाच्या रूपकातून देवालाच सांगतो आणि अर्थातच ती नष्ट होऊ नये हीच त्याची मनीषा असते. ज्या गोष्टी मिळाल्याचा फक्त आभासच त्याला इतके प्रफुल्लित करतो आहे, ते प्रत्यक्षात घडावे यासाठी देवाला शपथ घालतो. काहीही कर, बाकी सगळी कामे सोडून पहिले माझी स्वप्नं साकार कर असा हटून बसला आहे. 'सारा जहाँ छोड छाड के, मेरे सपने सावर दे' हे ऐकून त्या प्रियकराच्या निरागसतेमुळे एक निखळ हास्य आपल्या मनात डोकावते. आपली मागणी वास्तवाशी सुसंगत नसली तरीही देवाला अशी फक्त मागणी करून निर्माण होणारी आशासुद्धा त्याला धीर देत असावी.
यानंतर हे सर्व घडल्याबाबतची जबाबदारी देवावरच टाकून, प्रेम हि उत्कट भावना तूच सर्वांना दिली आहेस तर माझीपण कैफियत, मागणी तू ऐकलीच पाहिजे अशी सूचना करता करता तिला माझ्यानावे कर असे फर्मानाच सोडतो.
निरागसता, हट्ट, जिद्द, या मार्गाने जाणाऱ्या त्याच्या भावना शेवटी तिच्या आणि त्याच्यातील अंतराचा विचार करून अगदीच अगतिक होतात. आणि तो 'कैसा खुदा हैं तू बस नामक हैं तू' या ओळीतून देवाच्या शक्तीलाच प्रश्न विचारू लागतो. आपण गैर, जास्तीचे काही मागितले नाहीये तर आपल्याला ते मिळायला काय हरकत आहे ? असा प्रश्न घेऊन तो तितक्याच आग्रही भूमिकेतून त्याची मागणी पूर्ण करावी हे मांडत राहतो. त्यायोगे (माझ्या मनातील ) तुझे राज्य अबाधित ठेव आणि माझं प्रेमदेखील अबाधित ठेव अशी लालूच पण देवाला देऊ करतो.
मनातील भावनांच्या प्रवासाचा एक सुंदर अभ्यासच या शब्दातून गीतकाराने समोर मांडला आहे. त्या भावनांतील कंगोरे गाण्यातून खूप विनासायास उलगडले आहेत. तिच्या समोर असताना आनंदाचे तरंग अनुभवणाऱ्या त्याच्या मनातील दडलेली खरी खळबळही चपखल शब्दात वर्णन केली आहे. पण सर्वात महत्वाचे यात निरागसता कधीच सोडली नाहीये. एक बालहट्टच याद्वारे आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि प्रियकराच्या अवस्थेशी कनेक्ट करतो. कारण प्रेम किव्वा कोणतीही गोष्ट मिळवण्याची आशा, वेड , आणि त्यासाठीची उत्कटता हि आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते. हि गोष्ट युनिव्हर्सल असते.
ज्या ज्या वेळेस या युनिव्हर्सल कनेक्ट करणाऱ्या गोष्टी सामोऱ्या येतात, त्या त्या वेळेस आपण स्वतः निर्माण केलेल्या सर्व दायऱ्यांमधून बाहेर पडतो आणि एक वेगळीच कनेक्टिव्हिटी अनुभवतो. एका absolute existence चे दर्शन घडते जे आपला सगळा भोवताल पारदर्शक करते, नवी दृष्टी देते आणि नव्या उमेदीच्या नव्या दिशांनी घोडदौड करण्यास आपण सज्ज होतो. तुम्हाला आलाय का असा अनुभव? कधी आणि कसा सांगून हा कनेक्ट असाच वाढवा. शेवटी ज्याने हा कनेक्ट निर्माण केला ती गाणी खास आपल्यासाठी ... धन्यवाद 🙏🙏
पौर्णिमा ढेरे

Yes, very precisely and in very simple way explain in words and given special effects by connecting with songs.
उत्तर द्याहटवाLife moves with time on the path having various turns, at some time in journey of life knowing unknowingly we get a universal connect which connect us to our own existance अस्तित्व and gives lifetime energy to move on in life in all circumstances.
At times in the journey of life, on some turn that universal connect gets faded away.
Every stage of journey we get or find some new connect, but the universal connect which get faded/lost away with time and in journey of life remains as unique connect somewhere and provides energy to some individual till its existence अस्तित्व.