कनेक्ट

 खूप दिवसांपासून 'डायरी फॉरमॅट' मध्ये  लिहावं असं वाटत होतं. अव्यक्त या ब्लॉगद्वारे मनात दाटलेल्या खूप गोष्टी मुक्त केल्या आहेतच, त्यामुळे ब्लॉगवर डायरी पब्लिश करायला  हरकत नाही असं वाटलं होतं. 

लिहावं असं कधी वाटतं ? खिडकीतला कडुनिंब वाऱ्यावर  डोलला की....  माझ्या घराच्या खिडकीत डोकावणाऱ्या  या मित्राला, इलेक्ट्रिक पोलला मिठी  मारायला जाणाऱ्या त्याच्या खट्याळ फांद्या तोडून, पीसीएमसीने शिक्षा केली होती. वळवाच्या पावसाच्या एक दोन सरींतच पठ्ठया डवरलेल्या फांद्या दिमाखात मिरवत होता. आता परत त्याच्या अल्लड डहाळ्या वाऱ्यावर ताल धरू लागल्या आहेत. मनात कितीही थैमान असले तरी त्या नृत्याविष्काराने एक सुसूत्रता येते, subtleness येतो. 

अजून कधी लिहावसं वाटतं ? अथांग आकाशाचे छत्र आपल्या डोक्यावर उलगडले गेले की.... महफूझ वाटतं तेव्हा. कधीकधी तर या आकाशाने  कवेत घ्यावे असे वाटते.  शहरात राहणाऱ्यांना, टेरेसरुपी माळरानाने, थोड्या प्रमाणात का होईना घोंगावणाऱ्या वाऱ्यासकट हा show मॉर्निंग, मॅटिनी, प्राईमटाइमसाठी खुला केला आहे. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा असणार याची १००% खात्री. 

हा कनेक्ट जो लहानपणापासून मी अनुभवत होते; मध्येच कुठेतरी पळाला होता. आसने, व्यायाम करताना  प्रत्येक muscle शी, शरीरातील सांध्यासांध्यांशी, डोळे मिटले की स्वतःशी, अन हळूहळू कुठल्यातरी गूढ, अलौकिक, कृष्णविवरासारख्या खेचणाऱ्या शक्तीशी आपण अलगद कनेक्ट होतो. जणू एका क्षणातच कुठल्यातरी अनामिक विश्वात आपण विरघळतो. 

निसर्गाव्यतिरिक्त इतर अनेक कनेक्ट अलीकडेच माझ्या आयुष्यात दाखल झाले. मुलीच्या गोड आवाजाद्वारे 'संगीत' हा नवा आयाम मला मिळाला. मन शांत असेल, euphoric असेल, किव्वा स्फोटकदेखील असेल तरी आपल्यातील खूपजण, त्यांचा आवडता आवाज, instrumental, किव्वा अगदी bollywood melody यांचा आश्रय घेतात. संगीत हा खरंच एक युनिव्हर्सल कनेक्ट आहे.  कदाचित  ही waves आणि physics ची जादू असावी. असो, पण त्याची शास्त्रीय चिकित्सा आत्ता नको. 

खूप गोष्टी अनाकलनीय असतात. निदान माझ्यासाठीतरी  संगीत तसेच आहे. पण तरीही एखादे गाणे ऐकून....  mostly lyrics च ऐकू येतात मला...   पण आता हळूहळू संगीतामुळे गाण्याचा निर्माण होणारा अँबियन्स उलगडू लागला आहे.....   (All  credit goes to my hubby! )... तर या गाण्याशी एका वेगळ्याच लेव्हलचा कनेक्ट जाणवतो. आणि त्यानंतरही त्यावर खूप लिहावंसं किव्वा बोलावंसं वाटतं. बऱ्याचदा आळशीपणामुळे बोलूनच सगळं रितं होतं. पण मला अचानक भेटलेल्या साहित्यप्रेमी दोस्तांच्या आणि जिगरींच्या आग्रहामुळे लिहून काढावं असं ठरलं. 

वेदना, हुरहूर, रुखरुख, बोच, शल्य, अपूर्णतेची जाणीव व्यक्त करण्यातून उलगडणारं भावविश्व .....  आणि शाश्वततेच्या नुसत्या glimpse ने खुलत जाणारं भावविश्व  ..... खूप वेगळाच आनंद आहे दोन्हीत. दोन्हीत मुक्तता आहे. आपणच आपल्याभोवती निर्माण केलेल्या पाशांतून. पण एकाची  धाव  मर्यादित तर दुसऱ्यातून मिळणारी शक्ती अनंत आहे. पण ह्या मुक्तीचा आणि शक्तीचा अनुभव अचूकपणे कधीच दाखवता येत नाही हीच खरी मेख आहे. 

पाहुयात आपल्यातला हा नवा कनेक्ट आपल्याला कुठवर नेतो आहे ते 

पौर्णिमा ढेरे 

टिप्पण्या

  1. तु डायरी फॉर्म मध्ये व्यक्त होतीयेस हे खरंच छान आहे यात मनात आलेली प्रत्येक आनंद दायी किव्वा दुःखदायी गोष्ट आपण नमुद करू शकतो म्हणजे एखादी छोटी गोष्ट जिचं साजरं होणं इतरांच्या दृष्टीने तितकं महत्वाचं नसतं पण ज्याच्या बाबतीत आहे त्यालाच त्याची कदर असते तस काहीसं म्हणायचंय मला आपल्याला वाटलेली महत्वाची अगर बिनमहत्वाची गोष्ट आपण यात नमुद करू शकतो जस तुला
    कडीलिंबाच झाड इलेक्टरीक पोल ला फांद्यांद्वारे मिठाळतय असं वाटतं पण MSEB वाल्यांना आधीच त्यांच्या प्रेमाचा करंट लागला आणी त्यांनी फांद्या कापल्या

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Absolutely true. Your way of writing and expression is impressive. Would have felt better if the comment was not posted under annonymous ;-) It would have been better connect :-)

      हटवा
  2. योग्य शीर्षक : योग . इंग्रजी शब्द कमी असावेत असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Yes I expected this comment. But don't know why whenever I talk to myself I talk in English. So in this diary format I had translated all words in marathi except those where I feel English word is more apt.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युनिव्हर्सल कनेक्ट : गीत

युनिव्हर्सल कनेक्ट : अभिनय