पोस्ट्स

युनिव्हर्सल कनेक्ट : मोबाईल गेम्स

इमेज
तुमच्यापैकी किती जण माझ्यासारखे कार्टून लव्हर्स आहेत? हो, चाळिशी उलटली तरी ॲनिमेशन मुव्हीज, कार्टून फीवर असणारे बरेच जण असतात. कार्टून मधील करामती, नवनवीन आयडिया, औत्सुक्याने भरलेले डोळे, ओव्हर्जोईड एक्सप्रेशन्स, आपल्याला वेगळ्याच मानसिकतेत नेतात.  आज-काल गेम्ससाठी पण कमालीचे कार्टून ॲनिमेशन असते. गेम्समधील कार्टूनची चित्रे बघून मन एकदम प्रफुल्लित, एनर्जेटिक होते की नाही? गेम्सच्या एडिक्शन मागे सॉलिड स्टडी केलेली सायकॉलॉजी असते. चाकोरीचे खरडून कागद किंवा मेल सहीस पाठवले  तर ते बाउन्स बॅक होण्याची टक्केवारीच जास्त असते. गेम्सच्या लेव्हल्स "finish" करताना रोज काहीतरी 'achieve' करण्याची धडपड क्षणिक का होईना पूर्ण होते. त्यातून लेव्हल संपली म्हणून चिअर लीडरसारखे टुण्णकन  उड्या मारणारे कार्टून आपली व्हीक्टरी अजून अधोरेखीत करतात. स्क्रीनच्या कोपऱ्यातून तुमच्या गेमच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवणारा bear काय कौतुकाचं लुक देतो लेव्हल फिनिशच्या बोर्ड सोबत! झकास! रियल लाईफमध्ये हे अनुभवता तुम्ही? ज्या गोष्टी एका गेम डिजाइनरला कळतात या आपल्या आजूबाजूला, कार्यालयात, निदान घरात का अनुभ...

युनिव्हर्सल कनेक्ट : अभिनय

इमेज
प्रेमगीतांकडे म्हणजे बोलांकडे लक्ष जाणाऱ्या वयात जेव्हा मुलगी पदार्पण करते तेव्हा, एरवी आजीशी मजा मस्ती करत गाणे ऐकणाऱ्या, गुणगुणणाऱ्या तिचे पाय आता त्याच्या अर्थांकडे वळण्यास सुरुवात करतात. झोप येण्यासाठी लागणारी गाणी आता अगदीच झोप उडवतात असे नाही पण त्यांच्या शब्दांच्या कोहऱ्यामागे काय लपलंय हे ती शोधत असते. इतक्यात कुठल्या त्या शोधाला मूर्त रूप येणार आहे ? तिला खोल भावनांशी पहिला कनेक्ट आईकडूनच मिळत असतो. कारण आईचे प्रेम धबधब्यासारखे तर बाबांचे समुद्रासारखे असते. समुद्रात स्वतः शिरकाव केल्याखेरीज पाणी अंगावर येत नाही. धबधबा मात्र अंतर राखून अभे राहिलात तरी शिंतोड्यांचा प्रसाद देतोच! ती dedicate करत राहते सगळी गाणी आईला ...  ... एक दिवस तिच्या आजीला वेडीच आहेस असे खोडकर हसत म्हणणारे आजोबा तिला दिसतात. आजीचा सुरकुतलेला चेहरासुद्धा प्रसन्न हास्यात रंगून उजळलेला असतो. त्याक्षणी तिला प्रेम या शाश्वत अनुभवाचा काहीसा वेगळा कंगोरा जाणवतो. आजूबाजूच्या middle age crisis मध्ये फसलेल्या जोडप्यांच्या रॉक बँडच्या बॅकग्राऊंड स्कोअर पुढे  तिला हा संवाद जास्तच magical वाटतो. ...

युनिव्हर्सल कनेक्ट : गीत

इमेज
आजकाल संगीताचा आस्वाद ही खूपच वैयक्तिक बाब झाली आहे. मनाच्या कलानुसार गाणी हेडफोन द्वारेच ऐकली जातात किव्वा स्पीकर असेल तर तो कार मधला लॉन्ग ड्राईव्ह सोबतच! घरात पडलेल्या म्युझिक सिस्टिम्स , स्पीकर्स समारंभ किव्वा पार्टीपुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळे त्याच्यावर वाजणाऱ्या गाण्यांचा बाज वेगळा असतो. पूर्वी पूर्ण कुटुंबावर रेडिओचे संस्कार होते. घरातल्या  दिवसभरच्या एकांकिका, नाटके, भारुडांना  रेडिओचे पार्श्वसंगीत असायचे. त्यातूनच कदाचित अजरामर गाण्यांचा दबदबा निर्माण झाला आणि आजकालची गाणी अल्पायुषी झाली आहेत.   काही गाणी आता ऐकताना खूपदा असे वाटते कि, आपल्या वयामुळे किव्वा गाण्यांच्या चित्रीकरणातील, ध्वनिमुद्रणातील, संगीतातील दिगज्जांमुळे किव्वा हिंदी चित्रपटातील एकाच अक्षाभोवती  गिरक्या घेणाऱ्या कथानकामुळे आपण काही गीतांवर आणि गीतकारांवर अन्याय केला आहे. आंधी चित्रपटातील 'इस मोड से जाते हैं, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें ' यापैकीच एक.  यात नायक- नायिकेचे नाही, तर वेगवेगळ्या वाटांचे वर्णन आहे, याची आपण म्हणावी  तितकी दखल घेत नाही. त्...

कनेक्ट

इमेज
  खूप दिवसांपासून 'डायरी फॉरमॅट' मध्ये  लिहावं असं वाटत होतं. अव्यक्त या ब्लॉगद्वारे मनात दाटलेल्या खूप गोष्टी मुक्त केल्या आहेतच, त्यामुळे ब्लॉगवर डायरी पब्लिश करायला  हरकत नाही असं वाटलं होतं.  लिहावं असं कधी वाटतं ? खिडकीतला कडुनिंब वाऱ्यावर  डोलला की....  माझ्या घराच्या खिडकीत डोकावणाऱ्या  या मित्राला, इलेक्ट्रिक पोलला मिठी  मारायला जाणाऱ्या त्याच्या खट्याळ फांद्या तोडून, पीसीएमसीने शिक्षा केली होती. वळवाच्या पावसाच्या एक दोन सरींतच पठ्ठया डवरलेल्या फांद्या दिमाखात मिरवत होता. आता परत त्याच्या अल्लड डहाळ्या वाऱ्यावर ताल धरू लागल्या आहेत. मनात कितीही थैमान असले तरी त्या नृत्याविष्काराने एक सुसूत्रता येते, subtleness येतो.  अजून कधी लिहावसं वाटतं ? अथांग आकाशाचे छत्र आपल्या डोक्यावर उलगडले गेले की.... महफूझ वाटतं तेव्हा. कधीकधी तर या आकाशाने  कवेत घ्यावे असे वाटते.  शहरात राहणाऱ्यांना, टेरेसरुपी माळरानाने, थोड्या प्रमाणात का होईना घोंगावणाऱ्या वाऱ्यासकट हा show मॉर्निंग, मॅटिनी, प्राईमटाइमसाठी खुला केला आहे. प्रत्येक दिवसाचा,...