युनिव्हर्सल कनेक्ट : मोबाईल गेम्स
तुमच्यापैकी किती जण माझ्यासारखे कार्टून लव्हर्स आहेत? हो, चाळिशी उलटली तरी ॲनिमेशन मुव्हीज, कार्टून फीवर असणारे बरेच जण असतात. कार्टून मधील करामती, नवनवीन आयडिया, औत्सुक्याने भरलेले डोळे, ओव्हर्जोईड एक्सप्रेशन्स, आपल्याला वेगळ्याच मानसिकतेत नेतात.
आज-काल गेम्ससाठी पण कमालीचे कार्टून ॲनिमेशन असते. गेम्समधील कार्टूनची चित्रे बघून मन एकदम प्रफुल्लित, एनर्जेटिक होते की नाही? गेम्सच्या एडिक्शन मागे सॉलिड स्टडी केलेली सायकॉलॉजी असते. चाकोरीचे खरडून कागद किंवा मेल सहीस पाठवले तर ते बाउन्स बॅक होण्याची टक्केवारीच जास्त असते. गेम्सच्या लेव्हल्स "finish" करताना रोज काहीतरी 'achieve' करण्याची धडपड क्षणिक का होईना पूर्ण होते. त्यातून लेव्हल संपली म्हणून चिअर लीडरसारखे टुण्णकन उड्या मारणारे कार्टून आपली व्हीक्टरी अजून अधोरेखीत करतात. स्क्रीनच्या कोपऱ्यातून तुमच्या गेमच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवणारा bear काय कौतुकाचं लुक देतो लेव्हल फिनिशच्या बोर्ड सोबत! झकास! रियल लाईफमध्ये हे अनुभवता तुम्ही? ज्या गोष्टी एका गेम डिजाइनरला कळतात या आपल्या आजूबाजूला, कार्यालयात, निदान घरात का अनुभवता येत नाहीत?
काही माणसे अशी असतात की ज्यांच्या दर्शनाने, एका मिनिटाच्या संभाषणाने आतून काहीतरी ढवळल्यासारखे वाटते. Passionate माणसे खूप impactful असतात. कसलीही पॅशन असेना का त्यांना, त्यांच्या आवडत्या गोष्टींबाबत बोलताना त्यांच्या डोळ्यातून दिसणारे स्पार्क, चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे हास्य, आतून सळसळणारा उत्साह आपल्या मेंदूचे री-वायरिंग करून टाकतात. निगेटिव्हिटीच्या दाबाने एकमेकांना गच्च पकडून, कमालीचे जडत्व निर्माण करणाऱ्या आपल्या शरीरातील पेशी, अचानक सगळे बांध फोडून खळखळणाऱ्या झऱ्यासारख्या उसळतात. अगदी सळसळणारे रक्त जरी नाही निर्माण झाले तरी लाईटनेस जाणवतोच.
गेल्या काही महिन्यातील माझा करोनाचा अनुभव असाच आश्चर्यचकित करणारा होता. योग, व्यायाम, मसाज, डाएट अशा अनेक मार्गाने आपण एका लाईटनेसची अपेक्षा, अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात ज्या बॉडीला जपतो, त्या बॉडीलेसनेसचे फिलिंग अत्यंत सुखद असते. हा बॉडीलेसनेस एकतर लाईटनेसने मिळतो नाहीतर नम्बनेसने. एका लेव्हल पुढे गेलेला अशक्तपणा कमालीचं सुख आणू शकतो हे ह्या काळात मी अनुभवले. जेव्हा शरीरातील चेतना कमी होते तो अनुभव ...
न अंदाज कुठले, न अवधान काही,
कुठे जायचे यायचे भान नाही.
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा,
न कुठले नकाशे न अनुमान काही.
या संदीप खरे यांच्या काव्यपंक्ती सारखाच असतो.
आपण आपल्यावर लादलेली उद्दिष्टपूर्तीची गणिते पुन्हा तपासावी की काय? असा एक विचार एका क्षणी मनात चमकून गेला. ही उद्दिष्टपूर्ती आपल्यातील कुणासाठी, हे किती किंवा कशासाठी या इतकेच महत्त्वाचे आहे.
असो, तर कनेक्ट मध्ये खूप दिवसांनी कनेक्शन देणारा आणि कनेक्शन नसतानाचा तुल्यबळ अनुभव ज्या अगदीच लहान मुलांच्या टाइमपास गेम खेळताना जाणवला, त्यातील कार्टूनचे कनेक्ट करणारे चेहरे खास तुमच्यासाठी! बघा बुवा तुम्हाला काय क्लिक होतं?
पौर्णिमा ढेरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा